Veena Jamkar with her brother Vishal Jamkar |
पण मला आठवतं मी अगदी १५-१६ वर्षांची होते. आमच्याकडे एक अलिखित नियम आहे. वाढदिवसाला भेटवस्तू दिली नाही तरी चालते. पण, एक चॉकलेट आणि छोटं पत्र जरूर द्यायचं. तसं आजही आम्ही ते देतो. त्या वर्षी माझ्या वाढदिवसाला तसं त्याने मला पत्र दिलं, चॉकलेट होतंच. त्यात होतं..
'प्रिय राणू.. खूप प्रेम.. आणि पुढं डॉट डॉट होते, ते शेवटपर्यंत. शेवटी लिहिलं होतं तुझा दादा.'
मी विचारलं, अरे म्हणजे काय रे? तर नुसता हसला.. म्हणाला कळेल तुला. पुढे मला त्याचा अर्थ गवसला. त्याचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, की त्या पत्रात ते मावणं शक्य नव्हतं.
त्याला शब्दही अपुरे पडत होते. त्या 'डॉट डॉट'मध्ये खूप काही सामावलं होतं. ते जगावेगळं पत्रं आजही माझ्या मनात कुठेतरी खूप खोलवर जपून ठेवलंय मी.
This article was published in news paper on Rakshabandhan Occasion... Click here to read...
No comments:
Post a Comment